Posts

जमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर

Image
 जमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर जमिनीतील जिवाणू हे मातीची सुपीकतेमध्ये आणि पिकांच्या शरीरातील विविध क्रियांचा वेग वाढवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात.  त्याच प्रमाणे शेतामध्ये उपलब्ध सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याच्या प्रक्रियेतही ते उपयुक्त ठरतात. अशा योग्य प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून पिकांना पोषक द्रव्ये मिळतात. अशा उपयुक्त जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी जिवाणूखतांचा वापर विविध प्रकारे करता येतो. अलीकडे त्यात द्रवरूप जिवाणू खतेही उपलब्ध होत आहे. अशा जिवाणूखतांच्या वापरातून जमिनीची सुपीकता व उत्पादनामध्ये वाढ साधणे शक्य होते. जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती मूलद्रव्ये उपलब्ध करणामध्ये विविध जिवाणू कार्यरत असतात.  त्यात यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात. अशा जिवाणूंचे कल्चर खास प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते. असे विविध जिवाणू वेगवेगळ्या स्वर...